पेटीएम गुगल प्ले-स्टोअरवर पुन्हा उपलब्ध

फोटो स्रोत, Getty Images
डिजिटल पेमेंटसाठी भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं पेटीएम अॅप गुगलने अॅप स्टोअरवरून काढून टाकलं होतं. त्यानंतर आता काही तासांतच पेटीएमनं आपण परत आलो आहोत, असं ट्वीट केलं आहे.
"Update: And we're back!" असं ट्वीट पेटीएमनं केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यापूर्वी पेटीएमनं म्हटलं होतं, "नवीन डाउनलोड्स आणि अपडेट्ससाठी पेटीएम अॅड्रॉईड अॅप गुगल प्ले स्टोअरवरून तात्पुरतं काढण्यात आलं आहे. ते पे स्टोअरवर लवकरच पुन्हा येईल. तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्ही तुमचं पेटीएम अॅप पूर्वीप्रमाणेच सामान्यपणे सुरू ठेवू शकता."
पण, शुक्रवारी ही कारवाई करताना गुगलने म्हटलं की या अॅपच्या माध्यमांतून खेळावर पैसा लावून सट्टा खेळण्याची परवानगी आम्ही देत नाही.
गुगलने 18 सप्टेंबर रोजी एक ब्लॉग प्रसिद्ध करत म्हटलं आहे, "आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही आणि स्पोर्ट्स बेटिंगची सुविधा देणाऱ्या कुठल्याही अनधिकृत गॅम्बलिंग अॅपचं समर्थनही करत नाही. यात अशा अॅप्सचाही समावेश आहे जे ग्राहकाला पैसे किंवा रोख बक्षीस जिंकण्यासाठी एखाद्या पेड टुर्नामेंटमध्ये भाग घेण्याची परवानगी देणाऱ्या वेबसाईटवर नेतात. हे आमच्या नियमांचं उल्लंघन आहे."
यूजरला कुठलाही धोका पोहचू नये, यासाठी हे नियम असल्याचं गुगलने म्हटलं आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये गुगलने म्हटलं आहे, "एखादं अॅप जेव्हा नियमाचं उल्लंघन करतात तेव्हा आम्ही संबंधित अॅप डेव्हलपरला याची माहिती देतो आणि जोवर डेव्हलपर अॅपमध्ये सुधारणा करत नाही तोवर ते अॅप गुगल प्लेमधून काढून टाकतो. वारंवार नियमांचं उल्लंघन होत असेल तर आम्ही अधिक कठोर कारवाईही करू शकतो. यात डेव्हलपरचं गुगल प्ले खातंही बंद केलं जाऊ शकतं."
मात्र, आपल्या या ब्लॉगमध्ये गुगलने कुठेही पेटीएमचा उल्लेख केलेला नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )
























