आदित्य पौडवाल यांचे निधन

आदित्य पौडवाल

फोटो स्रोत, ADITYA PAUDWAL OFFICIAL/ FACEBOOK

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे पुत्र आणि संगीतकार आदित्य पौडवाल (35) यांचे निधन झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे सांगितले जात आहे. आदित्य संगीतकार म्हणून काम करत होते. दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे ते पुत्र. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमामध्ये त्याने 'साहेब तू' या गाण्याचा प्रोड्युसर म्हणून काम केले. सगळ्यात कमी वयाच्या संगीतकार म्हणूनही आदित्य यांना ओळखले जायचे. आईप्रमाणे आदित्यही भजन आणि भक्ती गीत गात असत. गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आदित्य यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणतात, "आमचा प्रिय आदित्य राहिला नाही. यावर विश्वास बसत नाही. तो उत्तम संगीतकार होता आणि चांगला व्यक्ती होता. मी नुकतंच एक गाणं गायलं होतं जे त्याने सुंदर प्रोग्राम केलं होतं."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गायिका नेहा राजपाल म्हणतात, "आदित्य खूप टॅलेंडेट होता. आमच्यातून एक टॅलेंडेट संगीतकार गेला यावर विश्वास बसत नाही. एवढ्या लहान वयात तो गेला. भावपूर्ण श्रद्धांजली"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)