You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कामगारांचं आयुष्य बदलणाऱ्या अनुसूया साराभाई - पाहा व्हीडिओ
बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.
'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.
अनुसूया साराभाई. त्यांना प्रेमाने सगळे जण मोटाबेन म्हणायचे आणि त्या नावाला त्या आयुष्यभर जागल्या. अनुसूया साराभाई भारततल्या कामगार चळवळीच्या अग्रणी समजल्या जातात.
अनुसूयांचा जन्म 1885 साली गुजरातधल्या अहमदाबादमध्ये एका धनिक परिवारात झाला. आईवडिलांचं छत्र लहानपणीच हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ काकांनी केली. त्यावेळेच्या प्रथांप्रमाणे त्यांचं लग्न 13 व्या वर्षींच झालं पण ते फार काळ टिकलं नाही. त्या आपल्या माहेरी परत आल्या. यानंतर त्यांचे बंधू अंबालाल यांनी अनुसूया यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि लंडनला पाठवलं.
अनुसूया आणि त्यांच्या भावातले बंध अतिशय घट्ट होते. आईवडिलांनंतर या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला होता. लंडनला निघताना अनुसूया यांना कदाचित कल्पनाही नसेल की भविष्यात आपण भावंड एकमेकांच्या विरोधात उभे ठाकू आणि हे वादही साधेसुधे नसतील तर भारतीय समाजाचं चित्र बदलतील.
या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?
- मुथुलक्ष्मी रेड्डी : देवदासीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदा संमत करून घेणारी महिला
- सुगरा हुमायूँ मिर्झा : बुरखा प्रथेचा अडसर दूर करत स्त्रियांचा आवाज बुलंद करणारी रणरागिणी
- चंद्रप्रभा सैकयानी: अविवाहित माता जिने आसाममधली पडदापद्धत संपवली
- रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला
- फाळणीतल्या निर्वासितांना आधार देणाऱ्या इंदरजीत कौर
- अॅना चंडी : हायकोर्टाची पहिली महिला न्यायाधीश
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)