कोरोना विद्यापीठ परीक्षा: आशिष शेलार - विद्यार्थ्यांना 'कोरोना ग्रॅज्युएट' संबोधले जाण्याची भीती - #5मोठ्याबातम्या

आशिष शेलार

फोटो स्रोत, Facebook/Ashish Shelar

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) 'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'

आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.

"कोरोना ग्रॅज्युएट अशा अशा नव्या बिरुदावलीने तर आम्हाला ओळखले जाणार नाही ना? एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?" अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचं शेलार म्हणाले.

"पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच आहे. त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे, ही आमची विनंती," असं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दुसरीकडे, विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुलगुरूंचं अनुकूल मत विचारात न घेताच झाल्याची बातमी लोकसत्तानं दिलीय.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत उशिरा का होईना, पण परीक्षा घेण्यात यावी असे मत कुलगुरूंकडून मांडण्यात आले होते. मात्र यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

2) उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ क्वारंटाईन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासह त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ क्वारंटाईन झालंय. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आल्यानंतर खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. टाइम्स नाऊ न्यूजनं ही बातमी दिलीय.

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज आणि त्यांच्या कुटुंबातील 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीतून उघड झाले. तसंच, त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय.

त्रिवेंद्रसिंग रावत

फोटो स्रोत, Twitter/@tsrawatbjp

फोटो कॅप्शन, त्रिवेंद्रसिंग रावत

या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या मंत्रिमंडळानं क्वारंटाईनचा निर्णय घेतल्याचं मंत्री मदन कौशिक यांनी माध्यमांना सांगितलं.

सतपाल महाराज हे ज्या 29 मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते, त्या बैठकीला हजर असणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलाय.

3) 'कोरोनाचं संकट भारतानं चुकीच्या पद्धतीनं हाताळलं'

भारतानं कोरोनाचं संकट चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याची टीका मेडिकल प्रोफेशनल असोसिएशननं केलीय. भारत सरकारनं गोंधळ निर्माण करणारं कठोर लॉकडाऊन लागू केल्यानं मोठी किंमतही चुकवावी लागतेय, असंही असोसिएशननं आपल्या पत्राकत म्हटलंय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन ही भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांची महत्त्वाची संस्था मानली जाते.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, ANI

"हे आरोग्य संकट भारतात आलं, त्याच्या सुरुवातीलाच स्थलांतरितांना आपापल्या राज्यात पोहोचवायला हवं होतं. आता स्थलांतरित कोरोनाचा संसर्ग घेऊन गावी परतत आहेत. ग्रामीण भाग आणि निम-शहरी भागात आरोग्य व्यवस्थाही कमकुवत आहे," असं मेडिकल प्रोफेशनल असोसिएशननं म्हटलंय.

हे पत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलं आहे.

कोरोना
लाईन

मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनमध्ये आरोग्य मंत्रालयाचे माजी सल्लागार, AIIMSचे आजी-माजी प्राध्यापक, बनारस हिंदू विद्यापीठ आणि जेएनयूतील संशोधक इत्यादींचा समावेश आहे.

4) महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांचा संप

महाराष्ट्रात 'दुष्काळात तेरावा महिना' अशी स्थिती झालीय. आधीच कोरोना, त्यात वादळ आणि आता रेशन दुकानादारांचा संप.

ऐन कोरोनाच्या काळात रेशन दुकानदारांनी संपाचं हत्यार उपसल्याची बातमी टीव्ही 9 मराठीनं दिलीय.

रेशन दुकानदारांनी मानधन, विमा, कमिशन, कोरोना प्रतिबंधात्मक उपायसह इतर मागण्यांसाठी आजपासून संपांचं हत्यार उपसलं आहे.

रेशन दुकान

कोरोना संकटाबरोबरच ग्राहक, प्रशासन आणि सरकारचा दबाव रेशन दुकानदारांवर असल्यानं दुकानदारांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा आरोप महाराष्ट्र रेशनिंग दुकानदार संघटनेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, संपामुळे रेशनिंग धान्यवाटपावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालीय.

5) महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये 'मराठी' विषय सक्तीचा

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

2020-21 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसंच, यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राज्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात याविषयीचे विधेयक दोन्ही सभागृहात मांडण्यात आले होते. या विधेयकानुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे. या कायद्यांच्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापकीय संचालकाला किंवा अन्य संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)