लॉकडाऊन विमान प्रवास: देशभरातली विमानतळं आजपासून अशी बदललेली दिसतील

अहमदाबाद एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या स्टाफला सूचना दिल्या जात असताना

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अहमदाबाद एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या स्टाफला सूचना दिल्या जात असताना
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजपासून म्हणजे 25 मेपासून देशभरात हवाई वाहतूक हळूहळू सुरू केली जातेय. कोरोनाशी लढण्यासाठी 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि त्यावेळी विमान वाहतूकही बंद झाली.

आज मुंबई विमानतळावरची परिस्थिती काही अशी आहे -

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

मात्र, आता विमानं पुन्हा भरारी घेणार असल्यानं विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कशी खबरदारीही घेण्यात येतेय, हे या फोटोंद्वारे पाहूया...

मुंबई एअरपोर्टवर विमानं

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुंबई एअरपोर्टवर विमानं

मुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक मानलं जातं. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही विमानं इथून उड्डाण करतात.

मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हे विमानतळ शांत आहे. आता टप्प्याटप्प्याने इथल्या अवकाशात विमानांचा आवाज पुन्हा गुंजेल.

बेल्ट

फोटो स्रोत, ANI

विमान धावपट्टीवर उतरलं की, सगळ्यांचेच कान उद्घोषणेकडे असतात. नेमक्या कुठल्या क्रमांकाच्या लगेज बेल्टवर आपल्या बॅग येणार आहेत, याकडे आपलं लक्ष असतं. विमानातून उतरल्यावर सगळ्यांचेच पाय या लगेज बेल्टच्या दिशेनं वळतात. मात्र, आता तिथेही गर्दी करता येणार नाहीय. सोशल डिस्टंन्सिंग पाळावं लागणार आहे.

विमान उड्डाणास अजून काही वेळ बाकी आहे, मग थोडं बसूया म्हणत आपण या खुर्च्यांवर गप्पा मारत बसतो. पण आता तिथंही अगदी एक खुर्ची सोडून बसावं लागेल. ज्या खुर्चीवर बसायचं नाहीय, तिथं तशी खूणच करून ठेवलेली असेल.

बेंगळुरू एअरपोर्ट

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, बेंगळुरू एअरपोर्ट

फ्लाईटला अजून बराच वेळ बाकी आहे ना? मग इथं बसा, पण अंतर ठेवून. किती अंतर ठेवायचं? चिंता करू नका, खुर्चीच सांगेल तुम्हाला तिच्यावर बसायचंय की नाही ते.

त्रिपुराचं अगरतला विमानतळ

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, त्रिपुराचं अगरतला विमानतळ

काही विमानतळांवर तर एक नव्हे दोन-दोन खुर्च्यांचं अंतर ठेवण्यात आलंय. अर्थात, हे आवश्यकच आहे. एवढं अंतर ठेवूनही गप्पांचा आवाज पोहोचतोच की.... मग हे अंतर पाळायला काय हरकत आहे. नाही का?

बॅग

फोटो स्रोत, ANI

विमानात शिरण्याआधी तुमच्या प्रत्येक बॅगला असं निर्जंतुकीकरण केलं जातं. तुमच्या आणि सहप्रवाशांच्या आरोग्याची काळजी अशी घेतली जातेय.

एअरपोर्ट

फोटो स्रोत, ANI

बोर्डिंग पास घेताना किंवा इतर कुठेही जेव्हा तुमचं ओळखपत्र दाखवण्याची वेळ येते, त्यावेळी अशी व्यवस्था करण्यात आलीय. काचेच्या पलीकडूनच तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागेल.

अहमदाबाद विमानतळ

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अहमदाबाद विमानतळ

विमानतळावर खबरदारी म्हणून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. तशी तयारीच करण्यात आलीय. या फोटोत तुम्ही त्या तयारीची एक झलक पाहू शकता.

रांगा

फोटो स्रोत, ANI

विमानतळ प्रशासनानं खबरदारी घेण्यात कुठलीही हयगय केलेली नाही. सोशल डिस्टंन्सिंग कसं पाळता येईल, त्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्यात.

झारखंडची राजधानी रांची इथलं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, झारखंडची राजधानी रांची इथलं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमातळ म्हटल्यावर सुरक्षेचा प्रश्न आलाच. तर विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गांभीर्यानं घेण्यात आलाय. विशिष्ट अंतर राखून ते पाहारा देत आहेत. आणि अशा स्वयंचलित काऊंटर्सद्वारे प्रत्येकाचं तापमान मोजमाप करण्याची सोय असेल.

गुवाहाटीचं एअरपोर्ट

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गुवाहाटीचं एअरपोर्ट

विमानतळात प्रवेशद्वाराबाहेर अशाप्रकारे खुणा करण्यात आल्यात. लोकांनी रांग लावतानाही अंतर राखावं यासाठीची ही शक्कल.

एअरपोर्ट

फोटो स्रोत, ANI

दीड-दोन महिने विमानं अशी विराजमान झाली होती. विमानतळ शांत पडले होते. अवकाशात विमानाचा आवाज गुंजत नव्हता. आता विमानं पुन्हा भरारी घेणार आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनानंतरचा विमानप्रवास कसा असेल? - पाहा व्हीडिओ
कोरोना
लाईन
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)