अमित शहा म्हणतात, 'मला काहीच झालेलं नाही, माझी तब्येत उत्तम आहे'

फोटो स्रोत, Getty Images
माझी प्रकृती उत्तम असून, मला काहीही झालेलं नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहा यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. कुणी त्यांना कॅन्सर झाल्याचं म्हणत होतं, तर कुणी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगत होतं.
त्या पार्श्वभूमीवर शहा यांनी ट्वीट करून अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अमित शहा?

फोटो स्रोत, AMIT SHAH/TWITTER
"गेल्या काही दिवसात माझ्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट अफवा पसरल्या आहेत. इतकंच काय तर काही लोकांनी ट्वीट करून माझ्या मृत्यूची प्रार्थना केली. देश सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई लढत आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने दिवसरात्र काम सुरू आहे. त्यामुळे या अफवांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.
"अनेकजण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेऊन व्यक्त होत आहेत. माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसात माझी विचारपूस केली. त्यांची काळजी मी समजू शकतो. माझी प्रकृती उत्तम असून, मला कोणताही आजार नाही.
"हिंदू मान्यतांनुसार, अशा पद्धतीच्या अफवांमुळे प्रकृतीला आणखी बळ मिळतं. अफवांसारख्या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, मलाही माझं काम करू द्या.
"अफवा पसरवणाऱ्यांप्रति माझ्या मनात कोणताही द्वेषभाव नाही. तुमचेही धन्यवाद."

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

अमित शहा यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर #AmitShah ट्रेंड होत आहे.
झारखंडचे भाजप नेते रघुवर दास यांनी लिहिलंय की, ''जाको राखे साइयां मार सके ना कोय''. म्हणजे ज्या व्यक्तीवर देवाचा आशीर्वाद असतो, त्याचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही.

फोटो स्रोत, Twitter
तर काही लोकांनी अमित शहा यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























