नांदेड कोरोना: गुरुद्वारा परिसरात 20 जणांना कोरोनाची लागण, इथून पंजाबला गेलेले 37सुद्धा पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

नांदेडमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढलीय. नांगेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागिनाघाट गुरुद्वारा परिसरात 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

शक्रवारपर्यंत नांदेड जिल्ह्यात 4 रुग्ण आणि एक मृत्यू अशी आकडेवारी होती. शुक्रवारीच केंद्रानं झोननिहाय जिल्ह्यांची यादी जाहीर केली. यात नांदेडमधील रुग्णांची आकडेवारी पाहता, केंद्रीय गृहमंत्रालयानं नांदेडला ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट केलंय.

मात्र आज आलेल्या अहवालातून नांदेडमधील रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलीय. नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी गुरुद्वारात आढळलेल्या रुग्णांबाबत सविस्तर पत्रक काढून माहिती दिलीय. जिल्हा माहिती केंद्रानं हे पत्रक ट्वीट केलंय.

नांदेड

फोटो स्रोत, Twitter/@InfoNanded

फोटो कॅप्शन, गुरुद्वारा परिसरातील अनेक भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेत.

आज सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेडमध्ये 1,235 संशयित रुग्णांची नोंद झालीय. नांदेडमध्ये एकूण 1,120 स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1,009 निगेटिव्ह असून, 65 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.

शुक्रवारपर्यंत 6 आणि आता नव्याने 20 रुग्ण असे मिळून नांदेडमध्ये रुग्णांची एकूण संख्या 26 वर पोहोचलीय.

आज शनिवारी आढळलेले सर्व 20 रुग्ण एकाच गुरुद्वाराच्या परिसरातले असल्यानं खळबळ उडालीय. या परिसरातील 97 लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यापैकी 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, तर 25 जणांचे अहवल निगेटिव्ह आलेत. उर्वरित अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना NRI भवन कोव्हिड केयर सेंटरमधअये दाखल करण्यात आलं आहे. विषाणूबाधित झालेल्या या गुरुद्वाराला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलंय.

यानंतर या भागातील ही ठिकाणं कंटेनमेंट झोन घोषित :

  • नगिनाघाट गुरुद्वारा परिसर
  • गुरुद्वारा लंगरसाहेब परिसर
  • गुरुद्वारा सचखंड गेट क्र 1 ते देना बँक, गेट क्र 2 ते 6
  • चिखळवाडी
  • कनकय्या कंपाऊंड
  • बडपुरा
  • शहीदपुरा
  • रामकृष्ण टॉकीज
नांदेड

फोटो स्रोत, Twitter/@InfoNanded

नांदेडहून पंजाबला गेलेले 37 पॉझिटिव्ह

तसंच ANIच्या एका ट्वीटनुसार, नांदेडहून पंजाबमधील होशियारपूरला परतलेल्या 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याी माहिती जिल्हाधिकारी अपनीत रियाईत यांनी दिली.

पंजाबमधील अनेक भाविक नांदेड इथं लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यांना बसद्वारे पंजाबमध्ये आणण्यात आलं. मात्र यापैकी अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट होतं आहे.

कोरोना
लाईन

नांदेडमधील श्री गुरुद्वारा लंगर साहिबमध्ये पंजाबमधून भाविक येत असतात. इथल्याच काही भाविकांना घेऊन एक वाहन पंजाबपर्यंत सोडण्यास गेलं होतं. या वाहनातील दोन चालकचालक आणि त्यांचा एक मदतनीस कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

23 एप्रिल 2020 रोजी नांदेडहून हे वाहन पंजाबच्या दिशेनं निघालं होतं. ते 28 एप्रिल 2020 रोजी नांदेडमध्ये परतलं.

नांदेडच्या अर्धापूर तालुक्याच्या सीमेवर या वाहनाला अडवून, वाहनचालक आणि मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात दोन वाहनचालक आणि मदतनीस हे पॉझिटिव्ह आढळले. तिघांनाही शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी इथं दाखल करण्यात आलंय.

या वाहनचालक आणि मदतनीस यांच्या 9 निकटवर्तींयांचीही चाचणी घेण्यात आली असून, त्यांचे अहवाल आले येणे बाकी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)