कोरोना महाराष्ट्र लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी - मुख्यमंत्री यांच्या संवादातील 12 मुद्दे

फोटो स्रोत, PIB
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली.
आजच्या संवादात साधताना पंतप्रधानांनी पुढील मुद्दे मांडले -
1.कोरोना साथीच्या सुरुवातीला चीन वगळता इतर जे 20 देश भारताबरोबर होते, त्या देशांमध्ये आज 7-8 आठवड्यांनंतर भारताच्या तुलनेत 100 पट जास्त लोकसंख्या बाधित आहे. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेनेदेखील साथ दिली, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय.

फोटो स्रोत, Twitter / @CMOMaharashtra
2.पण भारतावरचं संकट टळलेलं नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला पुढे जायचं आहे.
3.आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना घरी परत आणायचं आहे. परदेशातून अनेक भारतीयांना आणायचं आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारंटाईन करायचं आहे.
4.लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथील करायचे, ते राज्यांनी विचार करून ठरवायचंय. पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावं लागेल. कुठली वाहतूक सुरू राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे की नाही, दुकानं कशी सुरू राहतील, याबाबत निर्णय घ्यावा.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

5.3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते करा. "दो गज दूरी" हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूळ काळासाठी राहणार आहेत, हे लक्षात घ्या.
6.कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे, त्यामुळे लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल, असा समतोल ठेवणारं धोरण बनवा. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहे. 7.ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. 20 एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली, पण त्यामुळे आपले आव्हानही वाढलं आहे. नक्की कुठले प्रश्न वाढलेत, ते अभ्यासा.
8.मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत, पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मूल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचं जास्तात जास्त संपर्क तपासा

फोटो स्रोत, ANI
9.सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळच म्हटली पाहिजेत. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवनपद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज. असे झोन्स फुलप्रूफ करा. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे, याचं नियोजन आवश्यक आहे.
10.ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा आकडा वाढतोय, ती राज्यं काही गुन्हेगार आहेत, असं नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत, असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत, काहीही लपवू नका.
11.कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत, त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरी राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले पाहिजेतच.

12.प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधानांची ही चौथी व्हीडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्यं राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरू आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली.
महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























