कोरोना व्हायरस : नरेंद्र मोदींनीच देशात सणासारखं वातावरण निर्माण केलं - संजय राऊत : #5मोठ्याबातम्या

देशभरातील वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या पाच बातम्या
1. नरेंद्र मोदी यांनीच देशात सणासारखं वातावरण निर्माण केलं - संजय राऊत
लॉक डाऊनच्या विषयावरून खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लॉकडाउनला अजूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. हे वृत्त लोकसत्ताने दिला आहे.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

"आमच्या पंतप्रधानांना लॉकडाउनला लोक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याची चिंता आहे. प्रिय पंतप्रधान, भिती आणि चिंतेच्या या वातावरणात तुम्ही सणासारखी स्थिती निर्माण केली आहे, त्यामुळे असंच होणार. सरकार गंभीर असेल तर जनात गंभीर राहिल," असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील म्हणाले आहेत की टाळ्या, थाळ्या वाजून कोरोना पळून जाणार नाही.
2. घरी जाण्यास सांगितल्याने धुळ्यात पोलिसाला मारहाण
धुळे जिल्ह्यातील देवपुरातील अंदरवाली मशीद परिसरात मध्यरात्री बसलेल्या टोळक्याला पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे पोलिसाची कॉलर धरून मारहाण करण्यात आली. याशिवाय दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाचं नुकसान केले.
या प्रकरणी पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने 20 जणांच्या जमावाविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

फोटो स्रोत, Ani
मध्यरात्री देवपूर पोलीस ठाण्याचं गस्ती पथक गस्तीवर होतं. या परिसरातील इमाम अहमद रजा चौकात पोलीस पथक पोहोचलं. या वेळी चौकात काही तरुण बसले होते. मध्यरात्र झाली आहे. आता घरी जा, असे पोलीस कर्मचारी प्रकाश शंकर थोरात आणि इतरांनी जमावाला सांगितलं होतं. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
कर्फ्यूच्या काळात बाहेर पडल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, असं हिंदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे.
3. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे 32 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवराज मध्यप्रदेशच्या इतिहासात, चारवेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले नेते आहेत. यापूर्वी ते 2005 ते 2018 पर्यंत सगल 13 वर्षं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. ही बातमी जनसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, AFP
20 मार्चला कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर सीएम पदाच्या शर्यतीत शिवराज सिंह सर्वांत प्रमुख् दावेदार होते. ज्योतीरादित्य शिंदे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यावर काँग्रेसचं सरकार अस्थिर झालं होतं.
4. सरकारने मास्क आणि व्हेंटिलेटर्स राखून का ठेवली नाहीत? - राहुल गांधी यांचा सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मास्कच्या निर्यातीवरून हल्लाबोल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेशी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच हा गुन्हेगारी कट तर नाही ना असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. ही बातमी द हिंदूने दिली आहे.
5. राम मंदिर निर्माणाला सुरुवात
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या कार्याला वेग आला आहे. रामलला दुसऱ्या ठिकाणी काही दिवसांसाठी हलवण्यात येणार आहे, अशी बातमी दैनिक अमर उजालाने दिली आहे. सध्या यासाठी अनुष्ठान करण्यात येत आहे.
गुढीपाडव्याला रामलला तात्पुरत्या काळासाठी बांधण्यात आलेल्या मंदिरात राहणार आहेत. गेल्या 27 वर्षांपासून रामलला अयोध्येतील एका तंबुतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























