ब्रेकिंग : 31 मार्चपर्यंत पॅसेंजर गाड्या रद्द, मुंबईमध्ये लोकलही पूर्णपणे बंद राहणार

ब्रेकिंग
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

भारत सरकारनं कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून सर्व पॅसेंजर गाड्या 31 मार्च 2020 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच लोकलने प्रवास करू देण्याचा निर्णय शनिवारी (21 मार्च) घेण्यात आला होता.

त्यापाठोपाठ रेल्वेनं पॅसेंजर सेवा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र आता लोकलही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूर्णपणे शट डाऊनचा निर्णय असल्याचं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

कोरोना
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)