CAA वरून दिल्लीत भडकली दंगल, चार जणांचा मृत्यू तर 25 जखमी

दिल्ली में हिंसा

फोटो स्रोत, Reuters

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

उत्तर दिल्लीतील स्थिती आता नियंत्रणात असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय. या भागात सोमवारी दिवसभरात हिंसक घटना घडत होत्या.

या आंदोलनात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत.

रात्री उशीरा दिल्लीतल्या गोकुळपुरी भागात टायर मार्केटला आग लागल्याची घटना घडली होती. परिणामी संपूर्ण दिल्लीभर धुर पसरला आहे.

दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी रात्री उशीरा दिल्लीचे नायब राज्यपाल अनील बैजल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्याची मागणी त्यांनी केलंय.

तर दुसरीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी या घटनेवरून काँग्रेसवर टीका केली आहे. या घटनेमागे कोण आहे हे राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सोनिया गांधी यांनी महात्मा गांधींच्या भारतात हिंसेला स्थान नाही असं म्हणत आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच जबरदस्तीनं लोकांवर जातीया थोपवणं आणि लोकांमध्ये विभाजन करण्याला या देशात थारा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सोमवारी नेमकं काय घडलं?

सोमवारी दगडफेक आणि जाळपोळीसारख्या अनेक घटना उत्तर दिल्ली भागात घडत होत्या, अशी माहिती पोलीस सहआयुक्त आलोक कुमार यांनी दिली.

CAA समर्थकांनी मौजपूर आणि चांद बाग इथून मोर्चा काढल्यापासून या सर्व प्रकाराला सुरूवात झाली. या मोर्चादरम्यान CAA समर्थक आणि विरोधकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर स्थिती पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर गेली.

दिवसभरातील या सर्व घटनांमध्ये एक पोलीस आणि दोन नागरिक मृत्यूमुखी पडले, तर पोलीस उपायुक्त दगडफेकीत जखमी झाले.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि मोहम्मद सुल्तान यांच्या मृत्यूला पोलिसांनीही दुजोरा दिला. शाहीद अल्वी या ऑटो ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे.

कपिल मिश्रांनी चिथावणीखोर भाषण केलं - स्थानिक नगरसेवक

स्थानिक नगरसेवक हसीब उल हसन यांनी आरोप केलाय की, "CAA चं समर्थन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी जणू मुभाच दिली होती. घरात घुसून आंदोलकांना त्रास दिला जात होता. CAA समर्थकाच्या हातात बंदूक असल्याचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय."

CAA समर्थकांना पाठीशी घातल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळलाय.

नदीम
फोटो कॅप्शन, मौजपूरचे नगरसेवक नदीम

तर मौजपूरचे नगरसेवक नदीम यांनी भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्याचार आरोप केलाय. तसंच, त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कपिल मिश्रांविरोधात FIR दाखल करण्यासाठी अर्जही दिलाय.

नदीम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "माझा सहकारी ताहीर हुसैन यांच्या घरात तोडफोड आणि जाळपोळ झाली. मौजपूरमध्ये कपिल मिश्रा चिथावणीखोर भाषण देऊन गेले. त्यामुळं आज आणि काल दगडफेक झाली. त्यात पोलीस कॉन्स्टेबलचाही मृत्यू झाला. या सगळ्यामागे कपिल मिश्रा आहेत. म्हणून कपिल मिश्रा यांच्याविरोधात FIR दाखल करावं, यासाठी पोलिसांना अर्ज दिलाय."

जाफराबादमध्ये नेमकं काय झालं?

ईशान्य दिल्लीतल्या जाफराबादमध्ये CAA विरोधात आंदोलन सुरु असताना हिंसा झाली. दगडफेक आणि जाळपोळीमुळं या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस दलातील एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त जखमी झाले आहेत.

हजारोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागतेय.

दिल्लीच्या यमुना पार भागात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. दिल्लीच्या जाफराबाद, मौजपूर, सीलमपूर आणि चांदबाग या भागात हिंसाचार उसळला आहे.

काही भागात दगडफेक होत आहे तसेच काही ठिकाणी दंगेखोरांनी घरांना आगी लावल्या आल्या आहेत.

पोलिसांनी लाठीमार केल्यानं आंदोलनस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

शांतता राखण्याचं केजरीवालांचं आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना आवाहन केलंय की, दिल्लीत शांतता राखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी.

आग

फोटो स्रोत, AFP

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्लीच्या काही भागात अशांतता पसरवणाऱ्या घटना समोर येतातय. केंद्रीय गृहमंत्री आणि नायबर राज्यपालांना आवाहन करतो की, त्यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे."

सहाय्यक पोलीस आयुक्त गंभीररीत्या जखमी

आंदोलनातली हिंसा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) जखमी झाले.

ईशान्य दिल्ली

फोटो स्रोत, AFP

दगडफेकीदरम्यान दगड लागल्यानं शाहदराचे ACP हे गंभीर जखमी झाल्याची माहिती सहआयुक्त आलोक कुमार यांनी बीबीसीला दिली.

दरम्यान, रविवारी रात्री म्हणजे 23 फेब्रुवारीलाही जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या जवळ नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायाला मिळालं. तसंच, दिल्लीतल्या हौज रानी परिसरातही CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर लाठीमार करण्यात आला होता. त्यात काही महिला जखमीही झाल्या.

दिल्लीतल्या हौज रानीमध्ये काय झालं?

दक्षिण दिल्लीतल्या हौजर रानी इथं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अर्थात CAA विरोधी आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनावेळी हिंसा झाली.

या हिंसेत लहान मुलं आणि महिलांना दुखापत झाली. जखमींना मालवीय नगरमधील मदन मोहन मालवीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

दिल्ली पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा जखमींच्या नातेवाईकांनी केला. मात्र, दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी लाठीमार केल्याचा दावा स्वीकारला नाही. मात्र, ठाकूर यांनी या दाव्याचं खंडनही केलं नाही.

हौज रानी

लाठीमार केल्याच्या आरोपांची चौकशी करत असल्याचं अतुल ठाकूर यांनी ANI शी बोलताना सांगितलं.

दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये CAA ला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरु झालं, तेव्हाच हौज रानीमध्येही तसंच आंदोलन सुरु झालं होतं. हौज रानीतल्या गांधी पार्कात हे आंदोलन सुरु होतं. या आंदोलनातही महिलांची संख्या अधिक होती.

काल म्हणजे 23 फेब्रुवारीला आंदोलक महिलांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चावेळी हिंसा झाल्याचं समोर आलंय.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)