जामिया मिलियाः लायब्ररीत मास्क लावून बसलेला मुलगा कोण आहे?

जामिया मिलिया, शिक्षण, दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, BBC/JAMIA JCC

फोटो कॅप्शन, 15 डिसेंबरच्या जामिया मिलिया विद्यापीठातील लायब्ररीत हिंसाचाराच्या व्हीडिओत दिसणाऱ्या मुलाचं नाव सलमान आहे.
    • Author, कीर्ति दुबे
    • Role, फॅक्ट चेक टीम, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जामिया: लायब्ररीत हिंसाचाराच्या व्हीडिओत दिसणाऱ्या मुलाने चेहरा का झाकला आहे?

-मिटलेल्या पुस्तकातून कसा अभ्यास केला जात आहे?

-लायब्ररीत अभ्यासासाठी आलेली मुलं दरवाज्याकडे अस्वस्थ नजरेनं का पाहत आहेत?

-शांतचित्ताने अभ्यास करण्यासाठी लायब्ररी असते. मग वातावरणात एवढा तणाव का?

सोशल मीडियावर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील लायब्ररीत पोलिसांचा लाठीमार करतानाचा व्हीडिओ समोर आल्यानंतर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

16 फेब्रुवारी रात्री उशिरा जामिया कोऑर्डिनेशन कमिटीने 15 डिसेंबर रोजी लायब्ररीत पोलिसांकडून झालेल्या हिंसाचाराचा व्हीडिओ शेअर केला.

या व्हीडिओत जामिया मिलियामधील पहिल्या माळ्यावरील एम.फिल सेक्शनचा रिडिंग हॉल दिसतो आहे. मात्र या व्हीडिओत दिसणाऱ्या निळ्या स्वेटशर्टमधील मुलाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

काहीजण या मुलाला दगड फेकणारा म्हणत आहेत. या मुलाच्या वागण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

निळ्या स्वेट शर्टमधला मुलगा आहे तरी कोण?

बीबीसीने हा मुलगा कोण याचा शोध सुरु केला. व्हीडिओत हा मुलगा सगळ्यात पुढे दिसतो आहे. अनेक लोकांशी बोलल्यानंतर, संपर्क केल्यानंतर आम्ही या मुलापर्यंत पोहोचलो.

या मुलाचं सलमान आहे. सलमान सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पीएचडीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. याआधी त्याने जामियातूनच एम.टेक केलं आहे.

जामिया मिलिया, शिक्षण, दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, BBC/KIRTI DUBEY

फोटो कॅप्शन, एमएफिल रीडिंग रुम

सलमान पाटण्याचा आहे. जामिया नगरमध्ये एका भाड्याच्या घरात राहतो. सुरुवातीला पोलिसांपासून दूर राहायचं आहे असं त्याने आम्हाला सांगितलं. मात्र त्याच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत विचारल्यानंतर त्याने सविस्तर उत्तरं दिली.

लायब्ररीत चेहरा लपवण्याचं काय कारण?

स्वत:चा चेहरा रुमालाने झाकण्याचं कारण काय यावर सलमान म्हणतो, "पोलीस अश्रूधुराचा मारा करत होते. मी लायब्ररीत आलो तेव्हा अनेक मुलं अस्वस्थपणे इकडेतिकडे फिरत होती. कारण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. पोलीस सातत्यानं अश्रूधुर सोडतच होते. श्वास घेणं अवघड झालं होतं".

जामिया मिलिया, शिक्षण, दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, BBC/KIRTI DUBEY

फोटो कॅप्शन, सलमान पीएचडीचा विद्यार्थी आहे.

असं आहे मग पोलिसांनीही स्वत:चा चेहरा झाकला आहे. असं का? यावर तो म्हणाला, व्हीडिओत असं तर नाही की मीच तोंड आणि नाक झाकलं आहे. पोलिसही तोंड झाकून आमच्यावर अश्रूधुराचा वापर करत होते. मात्र माझी अगदी सहजपणे दगडफेक करणारा अशी हेटाळणी केली जाऊ लागली. अश्रूधुराने डोळे आणि त्वचेची जळजळ होत होती.

माझे घरचे हा व्हीडिओ शेअर झाल्यानंतर काळजीत आहेत. मला काहीतरी होईल अशी त्यांना काळजी वाटते आहे. मलाही यावर काही बोलायचं नव्हतं. परंतु आता मलाच लक्ष्य केलं जात आहे.

पुस्तक मिटलेलं का आहे?

सलमान सांगतात, त्यादिवशी संध्याकाळी नमाज अदा करण्यासाठी मी लायब्ररीतून खाली गेलो होतो. मी दुपारपासूनच रीडिंग हॉलमध्ये बसलो होतो. मी आंदोलनात सहभागी झालोही नव्हतो. माझ्या समोर जे हिरवं पुस्तक दिसतं आहे ते इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये नॉन-टेक पेपर असतो त्याचं आहे. जर मी पळून बाहेर आलो असतो तर माझंच पुस्तक घेऊन बसलो असतो. मला त्या पुस्तकाचं नाव आतापर्यंत लक्षात राहिलं असतं का? लायब्ररीचं गेट बंद होतं मात्र पोलीस ते गेट तोडून आत घुसत होते".

जसं दरवाज्यावर आवाज येऊ लागले तसं विद्यार्थी लपायचा प्रयत्न करत आहेत हे तुम्ही व्हीडिओत पाहू शकता. आम्हीही दरवाज्याकडे पाहतो आहेत. बाहेरचं वातावरण खराब आहे हे माहिती असताना आणि त्याचवेळी पोलीस दरवाजा तोडून आत घुसत असताना पुस्तक कसं वाचत बसणार? असा सवाल सलमान यांनी केला.

तुम्ही दरवाज्याकडे पाहत होतात, म्हणजे एकप्रकारे पोलीस येणार हे तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं. यावर सलमान म्हणतात, "पोलीस तळमजल्याहून वर येत असताना सगळ्यांनी लायब्ररीचे दरवाजे बंद करून घेतले. पोलीस गेट तोडून आत येऊ पाहत होते. ते पाहून विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाली. आम्ही टेबलाखाली लपलो नाही कारण आम्ही अभ्यास करत होतो आणि हे पाहून पोलीस आम्हाला त्रास देणार नाहीत".

जामिया मिलिया, शिक्षण, दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, BBC/KIRTI DUBEY

फोटो कॅप्शन, जामिया मिलिया विद्यापीठाचा परिसर

माझा फोन बंद होता नाहीतर माझ्या मित्रांनी मला कॉल करून पोलीस रिडिंग हॉलमध्ये येत आहेत असं सांगितलं असतं. जेणेकरून मी आधीच बाहेर पडलो असतो. मात्र तिथं अडकणं माझ्या नशिबात लिहिलं होतं.

दरम्यान ज्या रिडिंग हॉलचा व्हीडिओ समोर आला आहे त्याच्या तळमजल्यावर आणखी एक रिडिंग हॉल आहे जिथे पोलीस आधी आले होते.

अशा परिस्थितीत पोलीस पहिल्या मजल्यावरच्या रिडिंग हॉलमध्येही येतील असं वाटू लागलं होतं. म्हणूनच व्हीडिओत दिसणारे विद्यार्थी सगळे दरवाजाकडे पाहत आहेत.

तळमजल्यावरील रिडिंग हॉलमधील अनेक विद्यार्थी धावतधावत आमच्या हॉलमध्ये आले होते. पोलिसांनी तिथे असंख्य विद्यार्थ्यांना मारलं होतं. त्यामुळेच आम्ही लायब्ररीचे दरवाजे बंद केले होते.

आणखी एक व्हीडिओ

व्हीडिओत दिसणाऱ्या लायब्ररीला आम्ही भेट दिली. लायब्ररीच्या सगळ्या काचा तुटल्या आहेत. तुटलेल्या खिडक्यांमधून मी बाहेर बघितलं तर अस्ताव्यस्त खुर्च्या विखुरलेल्या दिसल्या. लायब्ररीच्या मुख्य दरवाज्याला कुलूप आहे. हिरव्या बोर्डावर लिहिलं आहे- Library under renovation

इंडिया टुडेला एक एक्सक्लुजिव व्हीडिओ मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या व्हीडिओत अनेक मुलं घाईघाईने रीडिंग हॉलमध्ये येत असल्याचं दिसतं आहे. एका विद्यार्थ्याच्या हातात दगड दिसतो आहे. त्यानंतर विद्यार्थी दरवाजा बंद करण्यासाठी टेबलं पुढे सरकवताना दिसत आहेत.

जामिया मिलिया, शिक्षण, दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, BBC/KIRTI DUBEY

फोटो कॅप्शन, रीडिंग हॉलच्या बाहेरचा फलक

जामिया मिलिया विद्यापीठाचा हा कथित व्हीडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील काही व्यक्तींना पोलिसांची बाजू बरोबर वाटते. मात्र हा व्हीडिओ पोलिसांच्या कारवाईच्या आधीचा आहे की नंतरचा हे स्पष्ट तसंच सिद्ध होऊ शकलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी