काश्मीर: श्रीनगर ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू, 15 जण जखमी

फोटो स्रोत, Reuters
भारत प्रशासित काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झालेल्या एका ग्रेनेड हल्ल्यात एका जणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती श्रीनगरचे एसएसपी हसीब मुगल यांनी दिली.
श्रीनगरमधील हरी सिंह स्ट्रीटवर ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त असून देखील ही घटना घडली. गेल्या आठवड्यात याच भागात ग्रेनेड हल्ला झाला होता. त्यात सात जण जखमी झाले होते.
काश्मीर खोऱ्यात तणाव कायम
काश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून तणाव कायम आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला राज्याला विशेष दर्जा प्राप्त होता. कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख यांची दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी करण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters
31 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू झाला. सरकारने लोकांच्या येण्याजाण्यावर तसंच संचारमाध्यमांवर कठोर निर्बंध लागू केले. यातील अनेक निर्बंध आजही लागू आहेत. काश्मीर खोऱ्यातील पत्रकारांच्या मते, तिथली परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गेल्या आठवड्यात संदिग्ध कट्टरतावाद्यांनी अन्य राज्यातून आलेले कामगार आणि ट्रक ड्रायव्हर यांना लक्ष्य केलं होतं. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे आणि लोक घाबरलेले असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. या हल्ल्याचा परिणाम काश्मीरमधल्या व्यापारावरही झाला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















