कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती, अनेकांचं स्थलांतर - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापुरात पावसामुळे नागरिकांचं स्थलांतर - पाहा व्हीडिओ
Published

कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीला पूर आला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाटयाने वाढली आहे.

मुसळधार पावसानं शहरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)