मुस्लिमांनी मतदान करू नये म्हणून पोलिसांनी केली मारहाण?- फॅक्ट चेक

सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडिओ

फोटो स्रोत, SCREEN GRAB

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये पोलीस काही मुस्लीम नागरिकांना मारहाण करत असल्याचं दिसतंय. मुस्लिमांना मतदानापासून रोखण्यासाठी ही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय.

या व्हीडिओसोबत लिहिण्यात आलं आहे : "मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना हे मुस्लिमांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. मीडिया हे दाखवणार नाही. त्यामुळे हा व्हीडिओ शेअर करा. मोदी सरकार आणि संघ यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे.

हा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर हजारो वेळा शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हीडिओवरील प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Social Media

'OSIX MEDIA' नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याखाली मजकूर आहे : "पराभवामुळे हताश झालेली एनडीए आता पोलिसांच्या मदतीने मुस्लिमांना मतदानापासून रोखत आहे. मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवेसना महिला, मुलं आणि म्हाताऱ्या माणसांना मारहाण करत आहे. निवडणुकीत नक्की मतदान करा."

व्हीडिओ

फोटो स्रोत, Screen grab

आमच्या वाचकांनी व्हीडिओची सत्यता पडताळण्यासाठी हा व्हीडिओ आम्हाला व्हॉट्स अॅपवरून पाठवला आहे.

व्हायरल व्हीडिओ

फोटो स्रोत, Social Media

व्हायरल व्हीडिओ

फोटो स्रोत, Social Media

या व्हीडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत आढळून आलंय.

व्हीडिओची सत्यता

रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून या व्हीडिओविषयी माहिती घेताना लक्षात आलं, की या व्हीडिओ संबंधित बऱ्याच बातम्या छापून आलेल्या आहेत.

1 एप्रिल 2019मध्ये छापून आलेल्या एका बातमीनुसार हा व्हीडिओ गुजरातमधल्या अहमदाबाद जिल्ह्यातल्या विरामगाम गावातला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हा व्हीडिओ विरामगाम गावातल्या भतीपुरा भागातला आहे. एक महिला कबरस्तानाच्या भिंतीवर कपडे वाळत घालत होती. त्याला काही लोकांनी विरोध केला.

या घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी बीबीसीने अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. आसरी यांच्याशी संपर्क केला.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "व्हीडिओमधील घटना जवळपास महिनाभरापूर्वीची आहे. 30 मार्च 2019 रोजी विरामगाम गावात एक महिला दफनभूमी भोवतालच्या भिंतींवर कपडे वाळत घालत होती. त्यावरून ठाकूर आणि मुस्लीम समाजात वाद झाला. यात एका समाजाच्या जमावाने दुसऱ्या समाजाच्या लोकांवर हल्ला केल्याने वादाला हिंसक वळण लागलं."

ते पुढे म्हणाले, "पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक गट पोलिसांवर चालून आला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली. हा व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरवणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या व्हीडिओचा सध्या सुरू असलेल्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही."

दाव्याची सत्यता : मुस्लिम नागरिकांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलीस मारहाण करत असल्याचा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर होतोय. या व्हीडिओत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत आढळून आलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)