You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुलाला पोर्शे गाडी चालवू दे', असं वडिलांनीच ड्रायव्हरला सांगितलं होतं?
पुण्यात एका भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवरील दोघांना धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील कारचालक आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता, असं समोर आलं आहे.
स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यानं पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं. त्यानंतर काही अटी घालत आरोपीला जामीनही मंजूर झाला. पण, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपीला एवढा लवकर जामीन कसा मिळाला? हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये विचारला जात आहे.
या प्रकरणी आरोपीच्या ड्रायव्हरने काय खुलासा केला? आणि पुणे पोलिसांनी आतापर्यंत काय काय कारवाई केलीय?
पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे