You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झाडावर अडकलेल्या बिबट्याच्या सुटकेचा थरार
जुन्नर तालुक्यातील बेल्हे-गुळूंचवाडी इथे एक बिबट्या वडाच्या झाडात अडकला होता.
अखेर वनविभाग आणि बिबट्या निवारा केंद्राच्या मदतीने या बिबट्याची सुटका करण्यात आली.
4 जानेवारीच्या पहाटे ही घटना घडल्याचं बोललं जातंय. बिबट्याने स्वतःहून सुटण्याचा प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय.
मात्र झाडावरच्या एका केबलमध्ये अडकल्याने त्याला बाहेर पडता आलं नाही. अखेर या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं.
त्यानंतर एका जाळीवर त्याला घेऊन पुढे माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात नेण्यात आलं. त्यानंतर बेशुद्धावस्थेतल्या बिबट्याला बिबट्या निवारा केंद्रात नेण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)