सुहास पळशीकर महायुती, महाआघाडी, इतर पक्षांबाबत काय म्हणतात?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमांमध्येही याची चर्चा सुरू आहे.
निवडणुकीत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार, कोणते फॅक्टर्स मतदारांवर आणि निकालावर प्रभाव टाकू शकतात, याच अनुषंगानं बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी चर्चा केली.
डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत चार वेगवेगळ्या भागांमध्ये आपण प्रकाशित करत आहोत.
त्यामध्ये आपण या गोष्टींचा वेध घेणार आहोत की जे प्रभावी मुद्दे आहेत ते नेमके कसे काम करतात, त्या गोष्टींचा इतिहास कसा आहे, त्या निमित्तानं महाराष्ट्र राजकारण कसं बदलत गेलं, कोणते मुद्दे प्रभावी ठरलेले आहेत, सध्या आपण जी स्थिती पाहत आहोत, त्याची पार्श्वभूमी काय आहे ती देखील आपण डॉ. सुहास पळशीकरांकडून समजून घेणार आहोत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






