You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगरमधल्या शेवगाव इथे दगडफेक का झाली?
शेवगाव शहरात एका मिरवणुकीदरम्यान दगडफेकीचा प्रकार घडलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीवेळी हा प्रकार झाला.
दोन गटांत झालेल्या या दगडफेकीत दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान झालं. संध्याकाळी निघालेली ही मिरवणूक रात्री इथल्या शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी दगडफेकीला सुरुवात झाल्याचं समजतंय.
यावेळी अफवांना सुद्धा उधाण आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून 31 जण ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)