कुस्तीगीर गंगेत पदकं विसर्जित करायला पोहोचले तेव्हा काय घडलं?

कुस्तीगीर गंगेत पदकं विसर्जित करायला पोहोचले तेव्हा काय घडलं?
Published

विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनियासह अनेक कुस्तीपटू आज उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये गंगेकाठी पोहोचले.

त्यांचं दिल्लीतलं आंदोलन रविवारी पोलिसांनी चिरडून टाकल्यावर या कुस्तीपटूंनी निषेध म्हणून त्यांनी कमावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह शरण यांच्यावर महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

अखेर शेतकरी नेते नरेश टिकैत तिथे दाखल झाले आणि त्यांनी या कुस्तीपटूंना त्यांचा निर्णय मागे घेतला. कारवाईसाठी 5 दिवसांची मुदत द्या, असं टिकैत यांनी कुस्तीपटूंना म्हटल्यावर अखेर या कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय मागे घेतला.

पाहा काय घडलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)