मेंदूची रहस्यं उलगडणाऱ्या मराठी संशोधक डॉ. शुभा टोळे
मेंदूची रहस्यं उलगडणाऱ्या मराठी संशोधक डॉ. शुभा टोळे
Published
भारतातल्या प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये आणि विज्ञानाच्या क्षेत्रातल्या आघाडीच्या महिलांमध्ये डॉ. शुभा टोळे यांचा समावेश केला जातो. डॉ. शुभा न्यूरोसायंटिस्ट आहेत आणि सस्तन प्राण्यांमध्ये मेंदूचा विकास कसा होतो, याविषयी त्यांनी संशोधन केलं आहे. अलीकडेच त्यांची इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनच्या निर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. यानिमित्ताने मेंदूवरचं संशोधन आणि संशोधन क्षेत्रातल्या महिला याविषयी डॉ. शुभा यांच्याशी बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांनी संवाद साधला.
कॅमेरा - शार्दूल कदम
एडिटिंग - शरद बढे






