पश्चिम बंगालमध्ये ट्रेन अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसची मालगाडीशी भीषण टक्कर
पश्चिम बंगालमध्ये ट्रेन अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसची मालगाडीशी भीषण टक्कर
Published
पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकून मोठा अपघात झाला आहे. सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
कांचनजंगा एक्सप्रेस आसामच्या सिल्चर-गुवाहाटीहून पश्चिम बंगालच्या सियालदहला जात होती. न्यू जलपैगुडीजवळ ही गाडी उभी होती, तेव्हा मालगाडी येऊन धडकली.
यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून 25-30 जण जखमी आहेत.






