राज्यात उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा
राज्यात उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा
Published
आधी पाऊस, वादळ आणि आता पुन्हा उष्णतेची लाट. काही दिवसांतच महाराष्ट्राचं वातावरण पुन्हा बदललं आहे. विशेषतः कोकणात सध्या उन्हाळा होरपळून काढतो आहे. इतका की इथे उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, 10 एप्रिलच्या आसपास विदर्भातील जिल्ह्यांमध्ये, विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना त्या दिवसासाठी यलो अलर्ट दिला आहे.





