UGCची घोषणा, विद्यापीठात वर्षातून दोनदा घेता येणार प्रवेश

UGCची घोषणा, विद्यापीठात वर्षातून दोनदा घेता येणार प्रवेश
Published

भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय.

जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या अॅडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या अॅडमिशन्स होतात.

वर्षातून दोनदा अॅडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?

समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - अमृता दुर्वे

निवेदन - विशाखा निकम

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?