You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात आंदोलन पेटलं,नॅशनल गार्ड्सच्या 2000 जवानांना तैनात करण्याचा आदेश
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटलं आणि त्यानं असं हिंसक वळण घेतलं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हे आंदोलन मोडण्यासाठी इथे नॅशनल गार्ड्सच्या 2,000 जवानांना तैनात करण्याचा आदेश दिला आहे.
अमेरिकेत बेकायदेशीररीत्या स्थलांतरांविरोधात छापेमारीची कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन पेटलं.
शनिवारी 7 जून 2025 रोजी लॉस एंजेलिसच्या पॅरामाऊंट भागात लॅटिन समुदाय आणि अमेरिकन इमिंग्रेशन एजन्सी आयसीईच्या अधिकाऱ्यांमध्ये खटका उडाला.
त्यानंतर पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी अश्रूधुराचा मारा आणि लाठीहल्ला केला. इथे आता माहौल थोडा शांत झाला आहे पण तणाव कायम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)