जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक, नेमकं काय घडलं?
जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक, नेमकं काय घडलं?
Published
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना 18 जुलैच्या सकाळी रुग्णालयात हलवलं. या विरोधात दिपके यांनी जंतरमंतरवर उपोषण सुरू केलं आहे. यानंतर दुपारी दिपकेंवर एका महिलेने शाई फेकली.
शाई फेकल्याने आंदोलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अभिजीत दिपके उपस्थितांसमोर बोलत असताना अचानक ही घटना घडली.
शाई फेकल्यानंतर दिपके यांचे समर्थक तातडीने मंचाकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्यावर निळ्या रंगाची शाई फेकण्यात आली होती.
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, या घटनेनंतर जंतर-मंतरवरील कार्यक्रम काही काळासाठी थांबवण्यात आला.
या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी निळ्या शाईला उद्देशून एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "निळा हा माझा रंग आहे, जय भीम!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






