न्यूजक्लिकवरील कारवाईचा प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून निषेध, सरन्यायाधीशांना पत्र लिहून म्हटलं...

फोटो स्रोत, facebook
न्यूज क्लिकवर झालेल्या कारवाईचा ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’कडून आज (4 ऑक्टोबर) निषेध करण्यात आला.
पत्रकार संघटनांनी यासंबंधी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. काही गोष्टींबाबत प्रक्रिया निश्चित होणं आवश्यक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
पत्रकार हे कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीयेत, याची आम्हालाही जाणीव आहे. मात्र चौकशीच्या वेळी पत्रकारांचे फोन, लॅपटॉप जप्त करताना काही नियमांचे पालन व्हावं. संबंधित गुन्ह्यांच्या चौकशीसाठी ज्या गोष्टी आवश्यक नाहीत, त्यांची जप्ती होऊ नये. कारवाईवेळी अधिकारी नियमाला धरून वागतील यासाठी जबाबदारी निश्चित व्हावी, असं सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सरकारच्या माध्यमांवरील दडपशाहीची कारवाई ही मर्यादेपलीकडे गेल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तपास यंत्रणांचा प्रसारमाध्यमांविरुद्धचा वाढता दडपशाही वापर थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं हस्तक्षेप करावा, असं आवाहन या पत्रात करण्यात आलं आहे.
ज्या पत्रकार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना हे संयुक्त पत्र लिहिलं आहे.
त्यात डिजीपब न्यूज इंडिया फाऊंडेशन, इंडियन वुमन प्रेस कॉर्प्स, प्रेस क्लब ऑफ इंडिया, न्यू दिल्ली फाउंडेशन फॉर मीडिया प्रोफेशनल्स, नेटवर्क ऑफ वुमन इन मीडिया, चंदीगड प्रेस क्लब, नॅशनल अलायन्स ऑफ जर्नालिस्ट, दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट, केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, फ्री स्पीच कलेक्टिव्ह, मुंबई प्रेस क्लब, अरुणाचल प्रदेश युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, प्रेस असोसिएशन ऑफ इंडिया, गुवाहाटी प्रेस क्लब, हैदराबाद तेलंगणा युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट यांचा समावेश आहे.
तपास यंत्रणांचा गैरवापर झाला
या संयुक्त पत्रात सरन्यायाधीशांना सांगण्यात आलं आहे की, देशातील तपास यंत्रणांचा पत्रकारांविरुद्ध कसा गैरवापर करण्यात आला आहे. संपादक आणि पत्रकारांवर देशद्रोह आणि दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्रकारांना त्रास देण्यासाठी खोट्या एफआयआरचा वापर करण्यात आला आहे.
या पत्राचा उद्देश कायद्यानं प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेत अडथळा आणणं हा नाही. पण जेव्हा पत्रकारांना बोलावून तपासाच्या नावाखाली त्यांची उपकरणं जप्त केली जातात, तेव्हा ते तपासण्याची गरज आहे.
चौकशीचं कारण सांगितलं पाहिजे
या पत्रात म्हटलं आहे की, पोलीस अटकेचं कारण स्पष्ट करण्यास घटनेनुसार बांधील आहेत. त्याचप्रमाणे चौकशीसाठी ही पूर्वअट असावी. म्हणजेच कोणत्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे हे सांगितलं पाहिजे.
यात त्यांनी म्हटलं आहे की, न्यूजक्लिक प्रकरणात पाहिलं आहे की अज्ञात गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली अस्पष्ट दावे करण्यात आणि पत्रकारांना त्यांच्या कव्हरेजबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
या चौकशीत शेतकरी आंदोलनं, कोव्हिड महामारीचा सामना आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शना दरम्यान केलेलं कव्हरेज या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
पत्रकार कायद्याच्या वर आहेत असं आम्ही म्हणत नाही, आम्ही त्यापेक्षा वर नाहीत. पण प्रसारमाध्यमांना दिलेल्या धमक्यांचा समाजाच्या लोकशाही जडणघडणीवर परिणाम होतो.
पत्रकारांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्याचे निकष असावेत
यामध्ये पत्रकारांचे फोन आणि लॅपटॉप अचानक जप्त करण्याच्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी काही निकष तयार करावेत, अशी मागणी सरन्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.
उपकरणं जप्त केल्यानं आमच्या व्यावसायिक कामात अडथळा येतो. पत्रात पुढे म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टानं पेगासस प्रकरणात निरीक्षण केल्याप्रमाणं स्त्रोतांचं संरक्षण हा माध्यम स्वातंत्र्याचा महत्त्वाचा आणि आवश्यक परिणाम आहे. पण लॅपटॉप आणि फोन ही फक्त अधिकृत कामं करण्यासाठी वापरली जाणारी अधिकृत साधनं राहिली नाहीत.त्यात महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते. त्यात छायाचित्रं आणि कुटुंब आणि मित्रांसह संभाषणांपर्यंत डाटा असतो. तपास यंत्रणांना अशी सामग्री का घ्यावी याचं कोणतंही स्पष्ट कारण नाही.
'न्यूजक्लिक' या वृत्त संकेतस्थळाशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (3 ऑक्टोबर) सकाळी छापे टाकल्याचं वृत्त आहे.
या पत्रकारांना चौकशीसाठी स्पेशल सेलच्या कार्यालयातही नेण्यात आलं.
चौकशीनंतर परंजॉय गुहा ठाकुरता आणि अभिसार शर्मा यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
परंजॉय गुहा ठाकुरता दीर्घ चौकशीनंतर लोधी रोडवरील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कार्यालयातून बाहेर पडले.
त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, नऊ पोलिस आज सकाळी गुरुग्राममधल्या माझ्या घरी आले. त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्यानंतर मी स्वेच्छेने त्यांच्या स्पेशल सेलच्या ऑफिसमध्ये आलो.”
त्यांनी पुढे सांगितलं की, पोलिसांनी मला मी न्यूजक्लिकचा कर्मचारी आहे का असं विचारलं. मी त्यांना सांगितलं की, मी तिथे सल्लागार आहे.”
“मी दिल्ली दंगल, शेतकरी आंदोलन कव्हर केलं आहे का, असंही त्यांनी मला विचारलं. माझं वेतन विचारलं. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पत्रकार अभिसार शर्मा यांची चौकशीही संपली.
त्यांनी एक्सवर लिहिलं की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिवसभर केलेल्या चौकशीनंतर मी घरी परत आलोय. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. घाबरण्याची काहीच गरज नाही.”
त्यांनी पुढे लिहिलं आहे, “सत्तेत असलेल्या लोकांना मी प्रश्न विचारत राहणार, विशेषतः त्यांना ज्यांना प्रश्नांची भीती वाटते. मागे हटण्याचा प्रश्नच नाही.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दरम्यान, सकाळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या छाप्यांनंतर या पत्रकारांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली होती.
वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी पहाटे पहाटे घरात छापा टाकून, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केल्याची माहिती अभिसार शर्मांनी दिली.
वरिष्ठ पत्रकार भाषा सिंग यांनीही एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "या फोनवरून हे शेवटचं ट्वीट. दिल्ली पोलिसांनी फोन जप्त केला आहे."
या छापेमारीनंतर अनेक पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या छापेमारीचा निषेध व्यक्त केलाय.
न्यूजक्लिक वेबसाईटशी संबंधित काही पत्रकारांना लोधी रोड येथील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल मध्ये नेण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
या छाप्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रकारांच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून माहिती गोळा करण्यात आली आहे. अमेरिकेतील लखपती नेविल रॉय सिंघम यांच्याकडून चीनच्या समर्थनार्थ बातम्या पसरवण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रेस क्लब ऑफ इंडियानं म्हटलं आहे की, “न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर टाकलेले छापे अत्यंत चिंताजनक आहेत. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे असून याबाबत अधिक माहिती द्यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करतोय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
काही काळापूर्वी या न्यूज पोर्टलवर चीनकडून निधी घेतल्याचा आरोप झाला होता आणि ईडीनं गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाल्याचं वृत्त नाही. दिल्ली पोलिसांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

फोटो स्रोत, Facebook/Abhisar Sharma
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ऑगस्टमध्ये काय म्हणाले होते?
ऑगस्ट महिन्यातही हे न्यूज पोर्टल चर्चेत होतं. या वेबसाईटचा हवाला देत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
“राहुलजींच्या बनावट प्रेमाच्या दुकानात चिनी वस्तू येऊ लागल्या आहेत," असा आरोप त्यांनी केला होता.
एका अजेंड्याचा भाग म्हणून भारताविरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला होता.

फोटो स्रोत, ANI
अनुराग ठाकूर ऑगस्टमध्ये म्हणाले होते, "2021 मध्येच आम्ही न्यूज क्लिकबद्दल उघड केलं की भारताविरोधात विदेशी शक्ती कशा काम करताहेत, भारताविरोधात कसा प्रचार केला जातोय. आणि अँटी इंडिया, ब्रेक इंडिया मोहिमेत काँग्रेस आणि विरोधी पक्ष त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले.
त्यानंतर त्यांनी आरोप केला होता की, "चिनी कंपन्या नेव्हिल रॉय सिंघमच्या माध्यमातून न्यूज क्लिकला निधी देत आहेत. पण त्यांचे सेल्समन भारतीय आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























