या लोकांवर 'आपण जिवंत आहोत' हे सिद्ध करण्याची वेळ का आली?

या लोकांवर 'आपण जिवंत आहोत' हे सिद्ध करण्याची वेळ का आली?
Published

अशोक जाटव हे मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातल्या खौरघार गावात राहतात. ते जीवंत आहेत पण कागदोपत्री त्यांचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षांच्या अशोक यांना आपला मृत्यू झाल्याचं कसं कळलं. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत त्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळायचे, ते बंद झाले.

मालक अशोक तीन गुंठे जमिनीचे मालिक आहेत आणि शेतमजूरी करून आपलं पोट भरतात. किसान सन्मान निधीसाठी त्यांनी प्रयत्न केले, तेव्हा त्यांना आपला कागदोपत्री मृत्यू झाल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात कलेक्टरकडे अर्ज केला. आता त्यांच्यासमोर मोठं आव्हान आव्हान आहे - आपण जीवंत आहोत हे त्यांना सिद्ध करावं लागणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)