You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवंश वाहतुकीच्या संशयावरून मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या
नाशिकच्या इगतपुरीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या करण्यात आलीय, तर एकजण गंभीर जखमी आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष म्हणवणारी व्यक्ती या घटनेत मुख्य आरोपी आहे. पप्पू उर्फ प्रदीप गोपाळ आडोळे असं त्याचं नाव आहे.
या घटनेत पडघा येथील लुकमान अन्सारी यांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी एकूण 15 ते 16 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 6 जणांना अटक करण्यात आलीय, तर इतरांचा शोध सुरु आहे.
पाहा नेमकं काय घडलं ते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)