वैशाली निलंगेकर : कर्णबधीर मुलीला स्विमर बनवणारी आई

वैशाली निलंगेकर : कर्णबधीर मुलीला स्विमर बनवणारी आई
Published

छत्रपती संभाजीनगरच्या वैशाली निलंगेकर यांनी अत्यंत कष्टातून आपल्या कर्णबधिर मुलीला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू बनवलंय.

आदितीला जन्मतः बहिरेपण असल्याचं जाणवल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र खचून न जाता त्यांनी या परिस्थितीला तोंड दिलं. आज त्या आदितीची आई म्हणूनच ओळखल्या जातात.

त्या सांगतात, "आज आदितीने 299 मेडल्स मिळालेले आहेत. तिला त्याच्यामध्ये स्टेट लेव्हल, इंटर स्कूल, सागरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय हे सगळे पदक आहेत." पाहा त्यांची आणि त्यांच्या लेकीची ही प्रेरणादायी गोष्ट.

रिपोर्ट, शूट आणि एडिट- राहुल रणसुभे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.