महाराष्ट्र-कर्नाटक वाद: एक गाव ठराव करून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतं का? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, मूलभूत सुविधा, शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार सीमाभागातील काही गावांनी केली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक वाद: एक गाव ठराव करून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतं का? सोपी गोष्ट
Published

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या तापलेला असतानाच आता नाशिकमधल्या काही गावांना गुजरातमध्ये, तर बुलडाण्यातल्या गावांना मध्य प्रदेशात आणि नांदेडमधल्या काही गावांना तेलंगणात जायची इच्छा आहे, अशाही बातम्या येत आहेत.

महाराष्ट्रात इतकी वर्षं राहूनही मूलभूत सोयीसुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार या गावकऱ्यांची आहे, आणि त्यामुळेच त्यांनी शेजारच्या राज्यात जाण्यासाठी निवेदनं दिली आहेत. काही ठिकाणी तशी आंदोलनंही झाली आहेत.

पण खरंच गावांनी असं ठरवलं तर ते दुसर्‍या राज्यांचा भाग होऊ शकतात का? याची कायदेशीर प्रक्रिया काय असते? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.