महाराष्ट्र-कर्नाटक वाद  : ‘महाराष्ट्रात घेत नाही तोवर चप्पल घालणार नाही’

व्हीडिओ कॅप्शन, मधु कणबर्गी 1956 पासून सीमाप्रश्नाच्या आंदोलनात सक्रिय आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक वाद  : ‘महाराष्ट्रात घेत नाही तोवर चप्पल घालणार नाही’
Published

72 वर्षीय मधु कणबर्गी गेली 50 वर्षं पायात चप्पल घालत नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार असा त्यांचा निश्चय आहे.

मधु कणबर्गी 1956 पासून सीमाप्रश्नाच्या आंदोलनात सक्रिय आहेत. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात यावा ही त्यांची मागणी आहे.