अवकाळी पाऊस, गारपिटीचा 'या' जिल्ह्यांना फटका, पिकांचं प्रचंड नुकसान

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस दोन दिवसांपासून थैमान घालतोय.
या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्येही गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 6 मार्चला साक्रीमध्ये रस्ते, शेतं हे गारांनी भरून गेल्याचं दृश्यं दिसलं.
अनेक शेतकरी आपल्या शेतातल्या गारा गोळा करून बाहेर फेकताना दिसले. विदर्भात वर्ध्यातही अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला.
इथल्या कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांची संत्री झाडावरून गळून पडली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



