H3N2 : भारतात खोकला, ताप, अंगदुखीचे रुग्ण वाढले, पुन्हा मास्क घालावा लागणार?

व्हीडिओ कॅप्शन, H3N2 : भारतात खोकला, ताप, अंगदुखीचे रुग्ण वाढले, पुन्हा मास्क घालावं लागणार?
H3N2 : भारतात खोकला, ताप, अंगदुखीचे रुग्ण वाढले, पुन्हा मास्क घालावा लागणार?
Published

H3N2 या विषाणूच्या संसर्गामुळे देशात दोघांचा मृत्यू झाला आहे. यात हरियाणा आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. देशात अनेकांमध्ये या विषाणूची लक्षणं दिसत आहेत. H3N2ची लागण झाली तर ३-४ दिवस ताप येतो, अंग दुखतं, थकवा जाणवतो, उलट्या किंवा मळमळतं.

तर दोन ते तीन आठवडे खोकला राहू शकतो. ऋतू बदलताना दरवर्षी लोकांना जो फ्लू होतो त्याचाच हा प्रकार आहे. पण अनेकदा या व्हायरसचं म्युटेशन होतं. त्यावेळी एकतर त्याची तीव्रता वाढते किंवा त्याचा प्रसार झपाट्याने होतो, असं आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत.

फ्लू

फोटो स्रोत, Getty Images