इर्शाळवाडी नेमकी कशी आहे? इर्शाळगड भौगोलिकदृष्ट्या कसा आहे?

व्हीडिओ कॅप्शन, इर्शाळवाडी नेमकी कशी आहे? इर्शाळगड भौगोलिकदृष्ट्या कसा आहे?
इर्शाळवाडी नेमकी कशी आहे? इर्शाळगड भौगोलिकदृष्ट्या कसा आहे?
इर्शाळगड
Published

मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर इर्शाळगड तुमच्या नजरेतून निसटला नसेल.

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.

मात्र ही इर्शाळवाडी एका मोठ्या दरडीखाली गाडली गेलीय. यात वाडीतल्या काही लोकांचा मृत्यू झालाय.

त्यामुळे या इर्शाळवाडीचा परिसर नेमका कसा आहे? हे आधी आपण जाणून घेऊयात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)