सोपी गोष्ट : NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय?
सोपी गोष्ट : NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय?
Published

NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली.

या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले.

4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती.

देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय.

  • रिपोर्ट - उमंग पोद्दार
  • निवेदन - सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग - निलेश भोसले