बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, अनेकांचा मृत्यू
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, अनेकांचा मृत्यू
Published
बांगलादेशात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या विरोधातल्या आंदोलनांना हिंसक वळण लागलंय. या हिंसाचारात किमान 25 जणांचा मृत्यू झालाय आणि शेकडो जण जखमी झाले आहेत.
1971 साली पाकिस्तानातून बाहेर पडण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात लढणाऱ्या आणि मरण पावलेल्या सैनिकांच्या म्हणजेच मुक्ती योद्ध्यांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला.
त्याविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी गेले अनेक दिवस निषेध मोर्चे काढत आहेत. काही नोकऱ्या महिला, वांशिक अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठीही आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.






