धबधब्याकाठी रील महागात, दरीत कोसळून मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, धबधब्याकाठी रील महागात, दरीत कोसळून मृत्यू
धबधब्याकाठी रील महागात, दरीत कोसळून मृत्यू
Published

रायगड जिल्ह्यातल्या माणगावमधील कुंभे धबधब्याजवळ एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. 27 वर्षीय आनवी कामदार 16 जुलै रोजी ती मित्रमैत्रिणींसोबत रील्स बनवण्यासाठी या धबधब्याजवळ गेली होती. तिथल्या एका सुळक्यावरून निसरड्या वाटेवरून जात असताना पाय घसरून ती दरीत कोसळली. पावसाळी पर्यटनातल्या सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.