कल्याणच्या घटनेतील आरोपीला अटक, पीडितेच्या वडिलांची पोलिसांकडे 'ही' मागणी

कल्याणच्या घटनेतील आरोपीला अटक, पीडितेच्या वडिलांची पोलिसांकडे 'ही' मागणी
Published

कल्याण पूर्वमधल्या चक्की नाका परिसरामध्ये अल्पवयीन मुलीबरोबर ही घटना घडल्यानंतर संतापाची लाट उसळली. 23 डिसेंबरला कल्याणमधील चक्की नाका परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने संतप्त स्थानिकांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. यानंतर पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी विशाल गवळी याला शेगावमधून पोलिसांनी अटक केली.

रिपोर्ट - अल्पेश करकरे

शूट - शार्दुल कदम