'जरा सभ्यता दाखवा!' लखनौ टीमचे मालक KL राहुलवर भडकले, चाहत्यांचा संताप
'जरा सभ्यता दाखवा!' लखनौ टीमचे मालक KL राहुलवर भडकले, चाहत्यांचा संताप
Published
बुधवार 8 मेच्या IPL सामना दोन कारणांनी गाजला – एक म्हणजे, सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना केवळ 9.4 षटकांत एकही विकेट न गमावता जिंकला.
आणि दुसरं म्हणजे, सामन्यानंतर व्हायरल झालेला एक व्हीडिओ ज्यात लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक टीमच्या कॅप्टनशी जरा आक्रमकपणे बोलताना दिसतायत.
या व्हीडिओवरून सोशल मीडियावर अनेक जण टीमचे मालक संजीव गोयंका यांच्यावर नाराज दिसतायत, तर केएल राहुलप्रति सहानुभूती व्यक्त करतायत.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे






