You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'7 दिवसांत शपथपत्र द्या, नाहीतर माफी मागा'; 'मतचोरी'च्या आरोपांवर निवडणूक आयोगानं काय म्हटलं?
'7 दिवसांत शपथपत्र द्या, नाहीतर माफी मागा'; 'मतचोरी'च्या आरोपांवर निवडणूक आयोगानं काय म्हटलं?
Published
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील गोंधळावर पत्रकार परिषद घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शपथपत्र मागितले. यानंतर असं शपथपत्र बंधनकारक आहे का? यावर अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.
यावर आज (17 ऑगस्ट) निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत उत्तर देत 'शपथपत्र देणं अनिवार्य आहे', असं म्हटलं.
ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांनी 7 दिवसांच्या आत शपथपत्र द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.