मुलींना खूप कमी वयात पाळी येण्याची कारणं काय?

व्हीडिओ कॅप्शन, मुलींना खूप कमी वयात पाळी येण्याची कारणं काय? त्यामुळे काय त्रास होऊ शकतो?
मुलींना खूप कमी वयात पाळी येण्याची कारणं काय?
Published

सध्या मुलींना अगदी आठव्या-नवव्या वर्षी पाळी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. वैद्यकीय भाषेत याला precocious puberty असं म्हणतात. पण इतक्या लहान वयात या मुलींना कोणतीही समज नसते.

अगदी सॅनिटरी पॅड कसं लावावं, त्याची विल्हेवाट कशी लावावी,शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी या सगळ्या गोष्टी उमजायचं पण हे वय नाही. त्यामुळे पालकही काळजीत पडतात. अतिशय कमी वयात पाळी येण्यामागची कारणं काय? त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? मुलीला वेळेआधी पाळी आली तर काय काळजी घ्यावी?

आज म्हणजे 28 मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया महत्वाची माहिती

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

हेही वाचलंत का?