बदलापूर अत्याचार प्रकरण : 'तुमचं नाव मोठं करायला माझ्या अक्षयला मारलं’
बदलापूर अत्याचार प्रकरण : 'तुमचं नाव मोठं करायला माझ्या अक्षयला मारलं’
Published
बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरूंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पाहा यानंतर त्याच्या आईने आणि पीडित मुलींच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली.






